कोकणरत्न तिबोटी खंड्या

   September 19, 2022

मे महिन्याचा उष्मा टोकाला पोचलेला, अंगाची लाही लाही होईल असे वातावरण, झाडांची पानं पण हलायची बंद. अश्या वेळेला कुठून तरी जोरदार वारा सुटतो, विजेचा एखादा लोळ आकाशातून जमिनीवर कोसळतो, वाऱ्याने वाहून आणलेले ढग आसमंत अंधारमय करून टाकतात आणि पावसाच्या शीतल सरी जमिनीवर कोसळतात. दर वर्षी कोकणात मान्सूनपूर्व सरी अश्या प्रकारच नाट्य निर्माण करत असतात आणि या नाट्याचा क्लायमॅक्स म्हणजे इंद्रधनू. सात रंगांची उधळण असणारं इंद्र धनुष्य डोळ्याचं पारणं फेडणार, याच इंद्रधनू चे रंग लेवून एक पक्षी याच वेळी कोकणात येऊन धडकतो. माणसाच्या दृश्य पटलातील जवळ जवळ सगळेच रंग ल्यालेला, ठेंगणा, सुबक, भली मोठी चोच, बाणाच्या वेगाने उडणारा, आणि समोर बसला तर सप्त रंगांची उधळण पेश करणारा हा पक्षी म्हणजे तीबोटी खंड्या अर्थात Oriental dwarf kingfisher (ODKF).

Image: Shantanu Kuveskar

Go to External Link: 
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_PULK_20220919_9_1